
इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतंत्रपणे लढणार आहे महाविकास आघाडी प्रणित शिव-शाहू आघाडी तून शिवसेना बाहेर पडून सर्व जागेंवर सर्व उमेदवार लढवून इचलकरंजी महानगरपालिकेवर भगवा फडकवणार जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांची पत्रकार बैठकीमध्ये माहिती
इचलकरंजी महानगरपालिकेची पहिली निवडणूक रंगतदार ठरत आहे सध्या सर्वच पक्षांमध्ये उमेदवारी मिळवण्यावरून तर जागा वाटपावरून वादविवाद सुरू आहेत तर कोण पक्षातून बाहेर जात आहे आज शिव-शाहू आघाडीतून व महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट बाहेर पडून इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे स्वतःच्या मशाल या चिन्हावर लढणार असल्याचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी सांगितले आज शिव-शाहू आघाडीतून आम्ही बाहेर पडून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याची प्रयत्नशील असणार आहेत आम्हाला शिव-शाहू आघाडीमध्ये सन्मान जनक जागा न मिळाल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसारच आम्ही हा निर्णय घेतला आहे त्यामुळे शिव-शाहू आघाडीतून अनेक पक्ष बाहेर पडल्यामुळे शिव शाहू आघाडीला धक्का बसला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने बाहेर पडल्यामुळे आता इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीमध्ये चौरंगी लढत होणार हे मात्र सिद्ध झाले या पत्रकार बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले मलकारी लवटे सागर जाधव याच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते