कुंभोज येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषद सदस्य डॉ .वर्षा अविनाश सावर्डेकर याची भेट; सोयीसुविधा लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन

हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषद आरोग्य समिती सदस्य व आळते जिल्हा परिषद सदस्य डॉ वर्षा अविनाश सावर्डेकर यांनी आरोग्य सेवांचा आढावा घेतला. यावेळी डॉ अभिनंदन पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.

या भेटीदरम्यान जिल्हा परिषद सदस्य डॉ वर्षा अविनाश सावर्डेकर यांनी आरोग्य केंद्रातील उपलब्ध सुविधा, कर्मचारी व्यवस्था तसेच अपुऱ्या असलेल्या सोयी सुविधांची सविस्तर माहिती घेतली. रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आवश्यक बाबी तातडीने मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. व त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रा ची पाहणी केली.व आरोग्य सेवा मध्ये प्रभावी सेवा देणारा सर्व काम करणारा डॉक्टर व कर्मचारी याचे कौतुक केले.

यावेळी डॉक्टर वर्षा सावर्डेकर , जितेंद्र सावर्डेकर , उमेश पाटील , कुंभोज वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिनंदन पाटील, औषध निर्माता मनीषा कुडाळे, आरोग्य सेविका मेघा सुतार, सोनम कंगने , विमल भंडारे, अशा गटप्रवर्तक पूनम माळी , सुरेखा मोहिते व कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *