
इचलकरंजी शहरातील श्रीमंत गंगामाई गर्ल्स ज्युनिअर कॉलेजमध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणुका लोकशाही मार्गाने संपन्न झाल्या.प्रथमतः अकरावी व बारावीच्या प्रत्येक वर्गाची मंत्रिमंडळ निवडणूक पार पडली. त्यामध्ये सेक्रेटरी, उपसेक्रेटरी, पार्लमेंट, क्रीडामंत्री, स्वच्छता मंत्री, ग्रंथालय मंत्री, वाद विवाद मंत्री, सांस्कृतिक मंत्री अशा पदांसाठी प्रत्येक वर्गामध्ये निवडणूक लोकशाही मार्गाने व गुप्त मतदान पद्धतीने यशस्वीरित्या पार पडली.
प्रत्येक वर्गातील निवडून आलेल्या सेक्रेटरी व पार्लमेंट या विद्यार्थिनींच्यातून ज्युनिअर कॉलेजची जनरल सेक्रेटरी, उप जनरल सेक्रेटरी, सभापती व क्रीडामंत्री यांची निवड करण्यात आली. ही निवड सुद्धा लोकशाही मार्गाने व गुप्त मतदान पद्धतीने घेण्यात आली. या निवडणुकीत जनरल सेक्रेटरी म्हणून वैष्णवी टक्कळगी 12 वी आर्ट्स अ
उपजनरल सेक्रेटरी पदासाठी लक्ष्मी सोनुले 11वी आर्ट्स अ
सभापतीसाठी समृद्धी कट्टीमणी 12 वी कॉमर्स अ
तर कॉलेजची क्रीडा मंत्री म्हणून कबड्डी खेळाडू अलहिदा उर्फ सबा शेख 12 वी कॉमर्स अ हिची निवड करण्यात आली.
या निवडणुका अतिशय उत्साहात व लोकशाही मार्गाने पार पडल्या. या निवडणुका पार पाडण्यासाठी कॉलेजचे उपप्राचार्य व्ही जी पंतोजी सर, पर्यवेक्षिका व्ही एस लोटके मॅडम ,ज्येष्ठ शिक्षक डी डी कोळी सर, जिमखाना प्रमुख बी एस माने सर व क्रीडाशिक्षक के ए पाटील सर व ज्युनिअर कॉलेजचे सर्व शिक्षक बंधू-भगिनी यांनी परिश्रम घेतले.या निवडी झाल्यानंतर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ ए एस काजी मॅडम यांनी विजयी विद्यार्थिनींचे बुके देऊन स्वागत केले.