पत्रकारांच्या वाढत्या हल्ल्याबाबत इचलकरंजी व्हॉइस ऑफ मीडिया तर्फे प्रांत कार्यालयासमोर निदर्शने

इचलकरंजी राज्यातील अनेक पत्रकारांवर वाढते हल्ले धमक्या व काही जिल्ह्यांमध्ये त्यांच्यावर होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज व्हाईस ऑफ मीडिया इचलकरंजी शहरतर्फे प्रांताधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांचा धिक्कार असो, पत्रकारांना न्याय मिळालाच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य करा, अशा घोषणा देण्यात आल्या. यानंतर प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार संजय काटकर यांना निवेदन देण्यात आले.

     यावेळी जिल्हाध्यक्ष साईनाथ जाधव यांनी पत्रकारांवर हल्ले वाढले आहेत. यावर शासनाने कठोर भूमिका घ्यावी अन्यथा आम्हाला इचलकरंजीत प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करावे लागेल असा इशारा या निवेदनातून दिला
पत्रकारांचे स्वातंत्र्य धोक्यात आले असून याबाबत व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम या संघटनेने आक्रमक पवित्र घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून आज इचलकरंजी व्हाईस ऑफ मीडिया तर्फे निदर्शने करण्यात आली.
 याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अकोला येथे एका आमदाराविरोधात बातमी प्रसिद्ध केल्याने टीव्ही नाईन मराठी चे प्रतिनिधी गणेश सोनोणे, साम टीव्हीच्या हर्षदा सोनोणे यांच्यासह तीन पत्रकारांवर  हक्कभंग  दाखल करून त्यांना पाच दिवस करावासाची शिक्षा सुनावली तसेच नांदेडमध्ये पत्रकार मुक्ता कदम यांनी नागरी सुविधांबाबत बातमी दिल्यानंतर निवडणूक आचारसंहितेचा भंग केला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, श्रीरामपूर येथे पत्रकार दत्तात्रय खेमनर यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या तर रत्नागिरीतील चिपळूण पतसंस्थेतील गैरप्रकार उघड करणाऱ्या दीपक भागवत या पत्रकारावर जीव घेणा हल्ला करण्यात आला पनवेल मध्ये ही एका पत्रकाराला जीवे माननीय धमकी देण्यात आली आहे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे पत्रकारितेचा गळा गोठण्याचा प्रयत्न झाला या सर्व घटनांचा निषेध आज इचलकरंजीत करण्यात आला व नायब तहसीलदार संजय काटकर यांना दिलेल्या निवेदनात  पत्रकारांचे जीवन धोक्यात आले आहेत याबाबत शासनाला आपण जाग आणून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली. यावेळी नायब तहसीलदार संजय काटकर यांनी आपल्या भावना शासनापर्यंत कळवू व तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले .
प्रांताधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी दिल्यानंतर निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष साईनाथ जाधव इचलकरंजी शहराध्यक्ष निखिल भिसे उपाध्यक्ष रविकिरण चौगुले इचलकरंजी महानगर अध्यक्ष बाळासाहेब पाटील खजिनदार शैलेश चव्हाण सेक्रेटरी संतोष काटकर सदस्य रोहन हेरलगे संतोष मोकाशी कमलाकर जाधव डिजिटल विंग शहरउपाध्यक्ष धीरज पाटील  उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *