कोष्टी प्रीमियर लीग २०२६ : टिम गणाकार वॉरियर्सचा दणदणीत विजय, डायनॉस्टार चषकावर नाव कोरले

कोष्टी प्रीमियर लीग (केपीएल) २०२६ सत्र ८ अंतर्गत आयोजित डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. राज्यभरातून खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेत एकूण १० संघांनी सहभाग नोंदवला होता. अंतिम सामन्यात टिम गणाकार वॉरियर्सने उत्कृष्ट कामगिरी करत डायनॉस्टार चषक आणि प्रथम क्रमांक पटकावला.

   स्पर्धेतील सर्वच लढती रंगतदार झाल्या. अंतिम सामन्यात टिम गणाकार वॉरियर्सने सर्वांगीण खेळ करत प्रतिस्पर्धी टिम कांबळे स्विगर्सवर मात केली. कांबळे स्विगर्सला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तृतीय क्रमांक टिम लोले चॅलेंजरने मिळवला, तर उत्तेजनार्थ पारितोषिक टिम झेनिथला देण्यात आले. महिला गटात खारगे टीमने विजेतेपद पटकावत विशेष लक्ष वेधले.

 वैयक्तिक पुरस्कारांमध्ये हर्ष आमणे यांना प्लेअर ऑफ द सिरीजचा मान मिळाला. पंकज डंबाळ यांना बेस्ट बॅट्समन, नरेंद्र म्हेतर यांना बेस्ट बॉलर, मंगेश ढवळे यांना बेस्ट फील्डर तर अनिकेत साखरे यांना प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार प्रदान करण्यात आले.

बक्षीस वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धेचे मुख्य प्रायोजक उद्योगपती शैलेश सातपुते व अभिजीत सातपुते उपस्थित होते. तसेच देवांग समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ मुसळे, हटकर कोष्टी समाज उपाध्यक्ष प्रभाकर उरणे, किट स्पॉन्सर रामकृष्ण वाघिरे, रोहित मेटे, सागर महिंद, विनोद मेटे, राहुल सातपुते, रमेश कबाडे, अनंत सातपुते, म्हाळसाकांत कवडे, पवन मेटे, अमृत कबाडे, कुमार कबाडे, सचिन लोले यांच्यासह सर्व टीम मालक व मान्यवर उपस्थित होते.

    पारितोषिक वितरण सोहळ्यात स्वागत केपीएलचे संस्थापक हेमंत आमणे, सत्र ८ चे अध्यक्ष अमित खानाज व उपाध्यक्ष राकेश चोथे यांनी केले. प्रास्ताविक राहुल सातपुते यांनी केले. यावेळी हरिश ढवळे, प्रशांत होगाडे, सुनील लोखंडे, पंकज डंबाळ व हरिदास सोनटक्के यांचेही आभार मानण्यात आले.

     दरम्यान, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रविकिरण सोकाशे, विशाल ढवळे, विनय मुसळे, गणेश मुसळे, अमर बुचडे, सनी खारगे, हरिदास सोनटक्के, यश कांबळे, विनायक वरुटे, विनायक सोनटक्के, पंकज डंबाळ, स्वप्निल ढवळे, एकनाथ कडोलकर, योगेश ढवळे, निखिल ढवळे, अभि लोले, अनिकेत वाघुरकर, अमोल नाकील, जयवंत तुरंबेकर, क्रुष्णात ढवळे, मंगेश ढवळे, दत्ता फातले आदी कमिटी सदस्यांनी मोलाचे योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *